बाळासाहेब देसाई फाउंडेशन दौलतनगर संचालित श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर या महाविद्यालयात अंतर्गत दर्जा हमी कक्ष व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि .08/09/2026 रोजी उद्योजकता विकास शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी पाटण तालुक्यातील येरफळे गावचे उद्योजक श्री. दत्ता पडवळ सृष्टी ऍग्रो व फ्युजन इंडिया कंपनीचे मालक प्रमुख पाहुणे उपस्थित होते.या कार्यशाळेमध्ये उद्योजक होण्यासाठी निर्णय क्षमता ,संयम,चिकाटी,प्रामाणिक पणा आणि कष्ट या गुणांची तयारी हवी असते.कोणताही उद्योग लहान मोठा नसतो तर त्याचा विस्तार करणे,उत्पादन ग्राहकापर्यंत पोहचविणे आणि जोखीम पत्करणे ही उद्योजकाची जबाबदारी असते. आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचविणे,ते खरेदी करण्यास प्रवृत्त करणे यासाठी मार्केटिंग कौशल्य, बाजार पेठेचा अभ्यास,मालाची गुणवत्ता,ग्राहकाची पसंती व विश्वास या वर व्यवसायाची प्रगती अवलंबून असते.यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता असते.व्यवसाय वृद्धी साठी डिजिटल माध्यमांच्या वापर गरजेचा आहे.असे मार्गदर्शन श्री.पडवळ यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.श्री.व्ही.एन.कांबळे सर होते

Featured Image

Description