**स्वातंत्र्यदिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन** दौलतनगर येथील .“श्रीमती विजयादेवी देसाई सीनियर कॉलेज** येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध आकर्षक व देशभक्तिपर रांगोळ्या साकारल्या. रंगांच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी देशप्रेम, स्वातंत्र्याचे महत्त्व आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडले. स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उत्कृष्ट रांगोळी साकारणाऱ्या विद्यार्थिनींचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यात देशभक्तीची भावना वृद्धिंगत झाली.
Description